मुंबई

खबरदार जादा भाडे आकाराल तर... खासगी बस वाहतूकदारांवर कडक लक्ष ठेवण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश

प्रशांत कांबळे ,

मुंबई  ः गणपतीच्या गर्दीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकीचे सध्याचे भाडे दरांपेक्षा दिड पट जादा भाडे खासगी बस वाहतूकदारांना आकारायचे आहे. मात्र, त्यापेक्षा जादा भाडे आकारत असल्यास राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे. 

राज्य शासनाने खासगी बस वाहतूकदारांचे भाडे निश्चित केले आहे. मात्र, गर्दीच्या हंगामात या खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुट चालविल्या जाते. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थीक लुट केल्या जाते. त्यामूळे या गणपतीच्या हंगामात खासगी बस वाहतुकदारांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटर भाडेदरांपेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी आरटीओ, एआरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यात येणार आहे. 

दरम्यान खासगी वाहतूकदार निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारतांना आढळून आल्यास अशा खासगी बस वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्याचे सुद्धा आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहे. 

येथे करता येणार तक्रार
गणपतीच्या गर्दीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदार जादा भाडे आकारत असल्यास प्रवाशांना राज्य परिवहन विभागाकडे तक्रार करता येणार आहे. www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा कार्यालयाचे नियंत्रण कक्षाचा  022-22614724, 022-22614727 या दुरध्वनी क्रमांकावर  तक्रार करता येणार आहे.

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT