Nana Patole Sakal
मुंबई

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; काँग्रेसची जाहीर नाराजी

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; काँग्रेसची जाहीर नाराजी मुख्यमंत्री ठाकरेंना राज्यपाल कोश्यारींनी पत्राद्वारे विचारले तीन महत्त्वाचे प्रश्न Bhagat Singh Koshyari Letter to CM Uddhav Thackeray Congress Nana Patole unhappy about Governor role

विराज भागवत

मुख्यमंत्री ठाकरेंना राज्यपाल कोश्यारींनी पत्राद्वारे विचारले तीन महत्त्वाचे प्रश्न

मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता मंगळवारी राज्यपालांनी वेगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. या पत्रात तीन महत्त्वाच्या प्रश्नांची विचारणा करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राजभवनात एक निवेदन दिले होते. त्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना विचारणा केली. त्या पत्राबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. (Bhagat Singh Koshyari Letter to CM Uddhav Thackeray Congress Nana Patole unhappy about Governor role)

"राज्यपाल कोश्यारींना भाजपच्या नेतेमंडळींनी निवेदन दिले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्याना काही प्रश्न विचारण्यात आले. यावरून असं दिसतं की राज्यपालांचेृ कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे. प्रथमच देशात असे झाले आहे की एखाद्या राज्याचे राज्यपाल हे भाजप किंवा रा स्व संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, त्यामुळे आम्ही त्या पदाचा सन्मानच करतो. राज्यपालांचे काम काय असते, हे मला वेगळं सांगायची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावली जात आहे असं दाखवलं जात असलं तरी यामागे सारं काही सांगण्याचं काम हे भाजपच करत आहे", अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपला टोला लगावला.

राज्यपालांच्या पत्रात नेमकं काय?

राज्यपाल कोश्यारी यांनी पत्र पाठवत, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, अधिवेशनाचा कालावधी आणि OBC आरक्षणाबद्दल सरकारला विचारणा केली आहे. उपरोक्त विषय अत्यंत महत्वाचे असल्यामुळे याबाबत आपण कार्यवाही करावी व मला त्याबाबत माहिती द्यावी, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनच का? अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक का घेतली जात नाही? असे तीन महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात पत्राद्वारे विचारण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT