bhalchandra nemade  esakal
मुंबई

Bhalchandra Nemade: 'इंग्रजांनी महाराष्ट्राला पेशव्यांच्या तावडीतून सोडवलं'; भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य

जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेब याच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात बरिच चर्चा सुरु झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Bhalchandra Nemade On nanasaheb peshwa:

मुंबई- जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेब याच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात बरिच चर्चा सुरु झाली होती. आता मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. नानासाहेब पेशवे जेथे जात तेथे 8 ते 10 वर्षांच्या मुलीची मागणी करत होते. या मुली त्यांना कशासाठी लागायच्या हे मी सांगत नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या माहितीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'पंजाबमधील गोविंदपंत बुंधेले यांना नानासाहेब पेशवे यांचे पत्र यायचं. दोन शुद्ध आणि सुंदर मुली 8 ते 10 वर्ष वयाच्या तयार ठेवाव्यात असं त्यात म्हटलेलं असायचं. 40 ते 42 वर्षांचे नानासाहेब पेशवे या मुलींना मारुन टाकायचे का काय माहिती नाही. त्यांना मुली कशासाठी लागायच्या मी सांगणार नाही. पेशवे हे खूप वाईट होते आपण त्यांच्या तावडीतून सुटलो हे खूप बरं झालं.' , भालचंद्र नेमाडे कार्यक्रमात बोलताना म्हणाले. गोविंदपंत बुंधेले यांना आलेली ही पत्रं मी वाचलेलं आहेत असंही ते म्हणाले.

आपल्याला जो इतिहास समजतो, तो काही खरा नाही. दुसरे बाजीराव पेशवे खूप मोठे माणूस होते, कारण त्यांनी महाराष्ट्राला वाचवून इंग्रजांच्या स्वाधिन केले. पेशवे म्हणजे दुष्ट आणि निच वृत्तीचे लोक होते. पुस्तकं वाचली पाहिजेत कारण आपल्याला जे सांगितलं जातंय ते खोटं सांगितलं जातंय. पुस्तकातून किमान आपल्याला खरा इतिहास कळतो, असंही नेमाडे म्हणाले आहेत.

मी लहानपणापासून जे काही वाचलं. आईकडून महानुभाव, लिळाचरित्र ऐकून मोठा झालो. तुकारामांना वाचून आम्ही मोठे झालो. तुकाराम आणि श्री चक्रधर यांच्याशिवाय कोण मोठं आहे जगात. जे खरं आहे ते पाहायचं. त्यामुळे खरी माहिती आम्ही काढली. हे सगळे लोक बदमाश होते. त्यामुळेच इंग्रज आले. त्यांच्याकडे जहाजे होते किंवा दारुगोळा होता म्हणून ते इथे आले नाहीत. इथल्या लोकांना धडा म्हणून ते इथे आले हा माझा त्यावेळचा समज होता, तोही माझा समज आता बदलत आहे. तेही बदमाशच लोक होते, पण जरा कमी, असं नेमाडे म्हणाले.

भालचंद्र नेमाडे औरंगजेबाबाबत बोलताना म्हणाले होते की, औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताचं. सर्वात आधी सती प्रथा बंद करणारा लॉर्ड बेंटिक नव्हता, तर औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली. काशी-विश्वेश्वर येथील पंडितांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्या नाहीत. चौकशी केल्यासं कळालं की तेथील पंडित तरुण बायकांना भूयारी मार्गतून नेऊन भ्रष्ठ करायचे.औरंगजेबाला जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्याने ज्ञानवापीची मोडतोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT