Bhaliwani Grampanchyat sakal
मुंबई

Bhaliwani Grampanchyat : ग्रामसेविकेने लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात

भालिवडी ग्रामपंचायत ग्रामसेविकेने थेट कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्‍याचा प्रकार आला समोर.

सकाळ वृत्तसेवा

भालिवडी ग्रामपंचायत ग्रामसेविकेने थेट कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्‍याचा प्रकार आला समोर.

नेरळ - काही महिन्यांपूर्वी ग्रामसेवक बदलून मिळावा या मागणीसाठी सरपंच, सदस्यांनीच ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्‍याचे समोर आले होते. त्‍यानंतर पुन्हा रुजू झालेल्या ग्रामसेविकेने थेट कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे भालिवडी ग्रामपंचायतामधील सरपंच, सदस्‍यांसह ग्रामस्‍थांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या वर्तवणुकीबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्‍याने १ फेब्रुवारी रोजी सरपंचांसह सदस्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी ग्रामसेवक देण्यात आला होता. मात्र त्‍यानंतर काहीच दिवसांत राजश्री कदम पुन्हा भालीवडी ग्रामपंचायतीत रुजू झाल्या. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी भालिवडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच दीपक कारले, ग्रामसेविका राजश्री कदम या काम करीत होते. यावेळी कर्मचारी विजय पिंगळे यांच्याकडे कदम यांनी बँकेत भरणा करायला दिलेल्या रकमेविषयी विचारणा केली. यावरून त्‍यांच्यात किरकोळ वाद झाला असता खटकले कदम यांनी आक्रमक होत थेट पिंगळे याच्या कानशिलात लगावली.

ग्रामसेविकेच्या बदलीची मागणी अनेकदा केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीला टाळेही ठोकले होते. त्यानंतर त्‍यांना पुन्हा भालिवडी ग्रामपंचायतीत रुजू करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी पूर्णवेळ दुसरा ग्रामसेवक द्यावा.

- दीपक कार्ले, सरपंच, भालिवडी

ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या जागी लगतच्या गावातील ग्रामसेवकांची नियुक्ती भालिवडी येथे केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.

- चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT