kirit-somyya.jpg 
मुंबई

Bhandup Hospital Fire: किरीट सोमय्यांचे सनराईज रुग्णालयावर गंभीर आरोप

दीनानाथ परब

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला काल रात्री भीषण  आग लागली होती. रात्री १२ च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत होरपळून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सनराईज रुग्णालयाने आगीच्या या घटनेसंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. रुग्णालयाने दोन रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे, तर कोविडमुळे झाल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सनराईज रुग्णालयाचा हा दावा फेटाळून लावला आहे. 

सनराईज हॉस्पिटलमधील त्या दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे झालेला नाही, ते खोट बोलतायत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी सनराईज हॉस्पिटलवर घोटाळ्याचा आरोप करत भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आज दुपारी तीन वाजता किरीट सोमय्या मंत्री अनिल परब यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे याचिकाही दाखल करणार आहेत. 

पीएमसी बँकेच्या पैशातून HDILने रुग्णालय आणि मॉल बांधले होते. हॉस्पिटलकडे ओसी प्रमाणपत्रही नव्हते. अग्निरोधक कुठलीही यंत्रणा नव्हती, असे आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

२५ पेक्षा जास्त गाड्या आग विझवत होत्या
भांडूप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली होती. या आगीत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व कोविड रुग्ण होते. हे मृतदेह जवळील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या मॉलमध्ये सनराईज हे कोविड रुग्णालय आहे.  या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत होते. अनेक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT