Shahapur Rain esakal
मुंबई

Shahapur Rain : शहापुरात रात्रभर मुसळधार; अनेक गावांचा संपर्क तुटला, गाड्या गेल्या वाहून, वाहतूकही ठप्प

शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली.

नरेश जाधव

नदीच्या पात्रजवळील सर्व इमारतीत पाणी शिरले, तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली.

खर्डी : रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला (Bharangi River) पूर आल्याने जवळच असलेल्या इमारतीच्या खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या. गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं, खर्डीच्या बागेचा पाडामधील मे महिन्यात बनवलेला पूल वाहून गेला, आसनगाव स्थानकानजीक पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली.

शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली. यासोबतच ठिकठिकाणी पाणी साचल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी साचल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. आटगाव-आसनगाव स्थानकादरम्यान झाड आडवे पडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. शहापूर नगरपंचायत हद्दीत भारंगी नदीचे सुशोभीकरण करताना कोणतेही नियोजन न केल्याने शहापूर जलमय झाले आहे.

नदीच्या पात्रजवळील सर्व इमारतीत पाणी शिरले, तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली. रहिवाशांना, कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. खर्डी येथील बागेचा पाडा येथील मे/जून महिन्यात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्याने येथील रहिवाशांचा संपर्क तुटला असल्याचे सुरेश घावट यांनी सांगितले. वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक 1 तासापासून ठप्प झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

Shahapur Rain

आसनगाव-माहुली रस्त्यावर गेल्या 3 महिन्यांपूर्वी झालेला पूल वाहून गेल्याने येथील संपर्क तुटला. भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचून रहिवाशांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक संतोष शिंदे, भानुदास भोईर व अविनाश थोरात यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT