Rahul Gandhi Sakal
मुंबई

Thane News : ठाण्यात धडकणार 'भारत जोडो न्याय यात्रा'; राहुल गांधीच्या आगमनाने कॉंग्रेसला येणार सुगीचे दिवस

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ठाणे हा पूर्वी कॉंग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात कॉंग्रेसची होणारी पिच्छेहाट, तर, ठाणे पालिकेत अवघे तीन नगरसेवक तर, जिल्हा परिषदेत एकही सदस्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे.

अशातच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यात येणार आहेत. त्यांच्या आगमनाने पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाला सुगीचे दिवस येणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

भाजपला रोखण्यासाठी राहुल यांनी संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. पहिल्या टप्यातील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दुसºया टप्यात ही यात्रा पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. त्यात आता, हि न्याय यात्रा येत्या १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली.

त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेचे नियोजन करण्यासाठी बैठक देखील झाली आहे. ही यात्रा ठाण्यातील कोण कोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागातून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत. परंतु मागील काही वर्षात ठाण्यासह जिल्ह्यात कॉंग्रेस पिछाडीवर गेल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेत देखील कॉंग्रेसचे इनमीन तीन नगरसेवक आहेत.

तर जिल्ह्यातही कॉंग्रेसची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र आहे. परंतु आता राहुल गांधी यांच्या निमित्ताने ठाणे कॉंग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

तब्बल ४० वर्षानंतर गांधी घराण्यातील व्यक्ती ठाण्यात

यापूर्वी इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनी देखील आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेला नाही. राहुल गांधी हे कोर्ट केस निमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु ठाण्यात ते प्रथमच येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT