Actress Tunisha Sharma Sakal
मुंबई

Tunisha Sharma : शोकाकुल वातावरणात तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार

आत्महत्या केलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा हीच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात भाईंदर पूर्व येथील गोडदेव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

आत्महत्या केलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा हीच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात भाईंदर पूर्व येथील गोडदेव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाईंदर - आत्महत्या केलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा हीच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात भाईंदर पूर्व येथील गोडदेव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तुनिषाच्या कुटुंबियांसह तीचे सहकलाकार तसेच आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिजान खान याची आई व बहीण देखील उपस्थित होते.

तुनिषा हीचा मृतदेह सोमवारी रात्री उशिरा भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. मंगळवारी  तीचे पार्थिव भाईंदर पूर्व येथील न्यू गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या सोनम इंद्रप्रस्थ इमारतीतील रहात्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी तीचे सहकलाकार कंवर ढिल्लो, विशाल जेठवा, केशभुषाकार श्याम भाटीया, दिग्दर्शक अब्बास अलीभाई आदींनी श्रद्धांजली वाहीली.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुनिषाच्या पार्थिवावर भाईंदर पूर्व येथील गोडदेव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तुनिषा हीची आई वनिता शर्मा यांच्यासह अन्य नातेवाईकांना भावना अनावर झाल्या. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात पोलीसांच्या ताब्यात असलेला अभिनेता शिजान खान याची आई व बहीण देखील स्मशानभुमीत उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT