Uttan Garbage Fire Sakal
मुंबई

Garbage Fire : उत्तन कचराभुमीला भीषण आग

उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर असलेल्या कचराभूमीला शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर असलेल्या कचराभूमीला शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

भाईंदर - उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर असलेल्या कचराभूमीला शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग एवढी प्रचंड होती की लांबूनही आगीच्या ज्वाळा अगदी स्पष्टपणे दिसून येत होत्या.

कचर्‍याला लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. गेल्या दोन दिवस तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे देखील कचराभुमीत साठून राहिलेल्या कचर्‍याला आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व एक पाण्याचा टँकर कचराभूमीवर पोहोचले. मात्र कचर्‍याला आतल्या बाजूने आग लागली असल्यामुळे त्यावर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळवणे शक्य झाले नव्हते. आगीमुळे उत्तन व आसपाच्या गावात मोठ्या प्रमाणात धूराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

शहरात गोळा झालेला वर्गीकरण न झालेला मिश्र स्वरुपातील कचर्‍यावर प्रक्रिया होऊ शकत नसल्यामुळे तो उघड्यावरच साठवण्यात आला आहे. या साठून राहिलेल्या कचर्‍यात विषारी वायू तयार होत असून त्याला अधून मधून आग लागण्याच्या घटना घडत असतात. आगीमुळे निर्माण होणारे धूराचे प्रचंड लोट आसपासच्या गावत पसरत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच स्थानिकांमध्ये कचराभूमीबद्दल प्रचंड नाराजी आहे.

कचराभूमीत उघड्यावर साठून राहिलेल्या कचर्‍यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या प्रकल्प अहवालाला नुकतीच शासनाने मान्यता दिली असून लवकरच ही प्रक्रिया सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT