भाईंदर ः महापौर मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.
भाईंदर ः महापौर मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक. 
मुंबई

भाईंदरवासींची पर्यावरणासाठी धाव

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर ः "पाणी वाचवूया, झाडे लावूया', "स्वच्छ, सुंदर मिरा-भाईंदरसाठी धावूया', आदींचा नारा देत स्पर्धकांनी मिरा-भाईंदर महापौर मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. 21 कि.मी. अर्ध-मॅराथॉनमध्ये पुरुष गटातून रंजित पटेल; तर माहिलांमधून हन्नाह गॅर्थड यांनी पहिला क्रमांक पटकावला. धावपटूंचा उत्साह आणि नागरिकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे स्पर्धेची रंगत वाढली. 

स्पर्धेची सुरुवात शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी झेंडा दाखवून झाली. या वेळी आयुक्त बालाजी खतगावकर, महापौर डिम्पल मेहता, सभागृहनेता रोहिदास पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता, स्थायी समिती सभापती रवी व्यास, ध्रुवकिशोर पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने, संभाजी पानपट्टे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, वाहतूक आणि शहरी पोलिस उपस्थित होते. एकूण साडेआठशे स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

मॅरेथॉन स्पर्धा 3 गटात पार पडली. 21 कि.मी. अर्ध-मॅरेथॉनमध्ये पुरुष गटातून रंजितने प्रथम, मिकियास लिम्लेनु याने द्वितीय, विष्णू रथिक याने तिसरा क्रमांक मिळवला; तर महिला गटात हन्नाहने प्रथम, मेल्क्‍म मेकोनेनने द्वितीय, आरती देशमुखने तिसरा क्रमांक मिळवला. 
स्पर्धेत 10 कि.मी.मध्ये रहित यादव, शैलेश गंगोडा, महिलांमध्ये श्रीदेवी म्हेत्रे, सोनिया मोकल, जयश्री भुजाडे यांनी बाजी मारली. 

विजेत्या स्पर्धकांना खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 5 कि.मी. फन रनमध्ये सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. अध-मिॅरेथॉनच्या प्रथम विजेत्यास 31 हजार; तर 10 कि.मी.च्या प्रथम विजेत्यास 15 हजार देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT