Bivandi Sakal
मुंबई

सुविधांची वानवा, जंगलातून रस्ता, महिलेची झोळीतच प्रसूती पण अखेर...

सकाळ डिजिटल टीम

भिवंडी : प्राथमिक सुविधांची वानवा असल्यामुळे भिवंडीत एका गरोदर महिलेच्या बाळाचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भिवंडी येथील दिघाशी गावातील धर्मीचा पाडा येथे मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. दर्शना फेरले असं या महिलेचं नाव असून सुविधांच्या अभावामुळे त्यांना त्यांच्या बाळाला गमवावे लागले आहे.

(Bhivandi Pregnant Women's Newborn Baby Death)

धर्मीचा पाडा येथील दर्शना यांना प्रसूती कळा येऊ लागल्याने त्यांना झोळीतून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. झोळीतून घेऊन येतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रस्ता नसल्याने पाण्यातून आणि जंगलातून रस्ता काढत हे गावकरी दर्शना यांना घेऊन जात होते. पण दिघाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे धर्मीचा पाडा येथून १ किमी अंतरावर आहे. दरम्यान, दवाखान्यात नेत असतानाच त्यांची रस्त्यातच प्रसूती झाली. त्यांना नंतर दवाखान्यात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत त्यांचे बाळ दगावले होते. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून आम्हाला प्राथमिक सुविधा कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

"आम्हाला प्रत्येक गरोदर महिलेला झोळीतूनच दवाखान्यात न्यावे लागते. कारण आमच्या पाड्यापासून दिघाशीला जाण्यासाठी रस्ता नाही. शासनाने लवकरात लवकर रस्त्याची सोय करून द्यावी" अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर "सदर महिलेला ४ दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दवाखान्यात भरती करण्यासाठी सांगितलं होतं. पण प्रसुतीनंतर दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती पण बाळाला लवकर सुविधा न मिळाल्याने आणि रस्ता नसल्याने बाळाचा मृत्यू झाला अशी माहिती वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT