mumbai sakal
मुंबई

भिवंडी काँग्रेसला पडणार खिंडार ?

समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोपनीय बैठकांना जोर

शरद भसाळे

भिवंडी : मुंबईवगळता (Mumbai) राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुका तीनसदस्यीय पद्धतीने घेण्याबाबत सरकारकडून परिपत्रक जाहीर झाल्याने भिवंडीत त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भिवंडी (Bhiwandi) काँग्रेसला (Congress) आधीच गळती लागली असताना, उरल्यासुरल्या नगरसेवकांनाही गळाला लावण्यासाठी समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. याबाबत गोपनीय बैठका सुरू असल्याने आगामी काळात काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असल्याच्या चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.

भिवंडी-निजामपूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक साधारण एप्रिल महिन्यात लागण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने उमेदवारांच्या प्रचाराच्या व निवडणुका लढण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यानुसार आपापल्या प्रभागांमध्ये पदाधिकारी व नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भिवंडी पालिकेत सध्या काँग्रेसचे ४७, भाजप २०, शिवसेना १२, समाजवादी पक्ष २, अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत या पक्षाला जिवंत केले आहे. दरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याने काँग्रेसच्या या १८ नगरसेवकांविरोधात कोकण भवन येथे याचिका दाखल असून हे प्रकरण प्रलंबित आहे. ठाणे

संभाव्य २०२२ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील व शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आपापल्या पातळीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी, समाजवादीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मैदानात उतरतील, हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025 : सूर्यकुमार यादवच्या विकेटने मॅच फिरली, सर्फराज खानचे अर्धशतक व्यर्थ; संजू सॅमसनच्या संघाचा मुंबईवर विजय

Matoba Maharaj Temple Theft : नैताळे येथील मतोबा महाराज मंदिरात धाडसी चोरी; तब्बल तीन किलो चांदीच्या दोन मूर्ती व दानपेटी घेऊन चोरटे पसार

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

Education News: मुख्याध्यापकपद रिक्त; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान दोन शाळांचे कामकाज शिक्षकांच्या भरवशावर

Land Partition Measurement : मोठा दिलासा! जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत; राज्य शासनाचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT