bhiwandi lok sabha election candidate will be from kunbi kunbi community mumbai politics sakal
मुंबई

Loksabha Election: भिवंडी लोकसभेसाठी कुणबी उमेदवार देण्याची मागणी

राजकीय पक्षांनी कुणबी उमेदवार दिल्यास त्यांना निवडुन आणणारच असा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

Bhiwandi Loksabha : येत्या अगामी लोकसभा निवडणुकीत विवीध राजकिय पक्षांनी कुणबी उमेदवार देण्याची मागणी भिवंडी तालुक्यातील एका गावात पार पडलेल्या सभेत करण्यात आली. (Thane Politics)

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कुणबी समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरीकांची सभा घागसपाडा (वाफाळे) येथे कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी घेण्यात आली.

यावेळी भिंवडी लोकसभा क्षेत्रात कुणबी समाजाची 7 लाख मतदार संख्या असताना तसेच कुणबी समाजाचे विवीध प्रश्न सोडविण्यासाठी विवीध राजकिय पक्षांनी कुणबी उमेदवार देण्याची एकमुखाने मागणी करण्यात आली तसेच ठाणे पालघर जिल्ह्यावर विशिष्ट समाजाचे प्राबल्य असुन मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजाला भिवंडी लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी अनेक वर्षांपासून मिळाली नाही.

तसेच कुणबी समाजाने शक्ती प्रदर्शन केल्याशिवाय विवीध राजकिय पक्ष दखल घेणार नाहीत. तसेच राजकीय पक्षांनी कुणबी उमेदवार दिल्यास त्यांना निवडुन आणणारच असा निर्धार सभेत करण्यात आला. (Maharashtra political News)

यावेळी कुणबी समाजातील कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील आमदार किसन कथोरे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उमेदवारी बाबत चर्चा करून यांना उमेदवारी मिळण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांची कुणबी समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे ठरविण्यात आले.

यावेळी अँड. युवराज पाटील, पंकज भोईर, पद्मण पाटील, अंनता पाटील, विष्णु गोष्टे, सि. एस. पाटील, अंनता पाटील दुगाडफाटा, हेंमत पाडेकर, निवृत्ती मगर, माजी सैनिक राजु पाटील विनोद कथोरे, नवनाथ वाघेरे यांनी आपली मते मांडली.यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेकडो कुणबी समाजातील मतदार उपस्थित होते.(Kunbi Reservation News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT