shivsena eknath shinde group sakal
मुंबई

Bhiwandi Loksabha : भिवंडी लोकसभेवर शिवसेनेचा (शिंदे गट) दावा; प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी

कल्याण लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भाजपा मदत करणार नसल्याचे चर्चेत असल्याने भिवंडी लोकसभेवर शिवसेना दावा करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खर्डी - गेल्या 10 वर्षात शिवसेनेला कडीपत्त्याप्रमाणे बाहेर टाकायचं काम करणाऱ्या कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत करणार नाही व लोकसभेसाठी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी शहापुर येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

यावेळी भिवंडी लोकसभेतील वाडा, भिवंडी, मुरबाड व शहापुर येथील पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भाजपा मदत करणार नसल्याचे चर्चेत असल्याने भिवंडी लोकसभेवर शिवसेना दावा करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जीवावर कपिल पाटील दहा वर्ष खासदार झालेत, शिवसेनेचे जिप व नगरपंचायतचे फोडण्याचे काम करून शिवसेनेचे आमदार पाडण्याचे काम ते करतात, गेल्या 10 वर्षांत एकही विकासकामे केली नसल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी यावेळी करून भिवंडीची जागा जर शिवसेनेला दिली तर सर्वात जास्त मतांनी निवडून आणू असे यावेळी त्यांनी जाहीर केले.

कल्याण पश्चिम व भिवंडी ग्रामीण येथे शिवसेनेचे आमदार असून शहापुर नगरपंचायत, वाडा नगरपंचायत व बदलापूर नगरपालिका येथे शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून आम्ही फक्त खासदारांच्या पालख्या वहायच्या का?

प्रकाश पाटील हेच आमचे उमेदवार असल्याचे मारूती धिर्डे यांनी सांगून भिवंडी लोकसभेत भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर, शहापूर नगरपंचायत,वाडा नगरपंचायत, बदलापूर नगरपालिका व ठाणे जिल्हा परिषद अशा विविध ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व असल्याने भिवंडीची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी जिल्हाप्रमुख मारूती धिर्डे यांनी जाहीर केले.

यावेळी शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, कल्याण (ग्रा) तालुका प्रमुख वसंत लोणे, वाडा तालुकाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा सचिव कांतीलाल कंठे,संपर्क प्रमुख अनिल घोडविंदे, गटनेत्या डॉ.कामिनी सावंत, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, अरुण कासार, आकाश सावंत, सचिन तावडे, शरद वेखंडे, पद्माकर वेखंडे, रेखा इसामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

Bike tyre replacement : टू-व्हीलर गाडीचे टायर किती दिवसांनी बदलावेत? मोठं नुकसान होण्याआधीच जाणून घ्या

Mumbai News: बीएमसीची मोठी कारवाई! मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर बुलडोझर, व्हिडिओ व्हायरल

India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT