Nilesh Sambre sakal
मुंबई

Bhiwandi Loksabha Election : भिवंडीत होणार तिरंगी लढत; वंचितकडून निलेश सांबरेना उमेदवारी

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण पाठोपाठ भिवंडी लोकसभा मतदार संघ हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मनाला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - भिवंडी लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष हे अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज वंचितच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भिवंडी लोकसभेसाठी निलेश सांबरे याना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण पाठोपाठ भिवंडी लोकसभा मतदार संघ हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मनाला जात आहे. या मतदार संघात महायुतीकडून कपिल पाटील यांना तर, महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचवेळी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांनी देखील भिवंडीतून निवडणुक लढविण्याचे संकेत दिले होते.

मात्र, ते अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच गुरुवारी वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत भिवंडी लोकसभा मतदार संघातून निलेश सांबरे याना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भिवंडीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT