Nilesh Sambre sakal
मुंबई

Nilesh Sambre : वंचितकडून उमेदवारी नव्हे तर पाठींबा; निलेश सांबरे लढविणार अपक्ष निवडणूक

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खलबत्ते सुरु आहेत.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खलबत्ते सुरु आहेत. अशातच भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

त्याचवेळी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे देखील निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या सांबरे यांची वंचितने गुरुवारी उमेदवारी जाहीर केली. मात्र, सांबरे यांनी वंचितकडून उमेदवारी नव्हे तर केवळ पाठींबा असल्याचे सांगत अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहीर केले.

ठाणे लोकसभेपाठोपाठ भिवंडी लोकसभा राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. या ठिकाणी भाजपने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना उमेदवारी बहाल केली आहे.

अशातच जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबारे हे देखील आपले नशीब आजमाविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. असे असतानाच, वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सांबरे यांना उमेदवारी जाहीर केली.

परंतु ते वंचित बहुजन आघाडीतून लढण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांबरे यांनी समाज माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भिवंडी लोकसभा निवडणुक ही जिजाऊ विकास पार्टी मधून अपक्ष म्हणुन लढविणार आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने मला पाठींबा दर्शविला आहे,  असे सांबरे यांनी म्हटले आहेत.

जिजाऊ संघटनेच्या माध्यमातुन गेली १५ वर्ष मी स्वः खर्चाने समाजतल्या दुर्बल आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. यापुढे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाही मुल्यांचे जतन व्हावे तसेच त्यांच्या विचारांधारेवर चालणारी सर्वसमावेशक भूमिका निभावण्याचा एक भारतीय नागरिक म्हणुन माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन पार्टीने दिलेल्या पाठींब्याबद्दल  प्रकाश आंबेडकर तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, नेते आणि समस्त कार्यकर्ते यांचे आभार सांबरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT