police 
मुंबई

कोरोनाचा योद्धांना विळखा; एकट्या भिवंडीत 70 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना लागण

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 अंतर्गत सहा पोलिस ठाण्यातील तब्बल 78 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामध्ये एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या समावेश आहे. दरम्यान ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत सदर पोलिसांचे तब्येतीची चौकशी करून काळजी घेण्याच्या सूचना देत सतर्क राहण्याचे पोलिसांना आदेश दिले, तसेच भिवंडीतील परिस्थितीचा आढावा घेतला.

शहर पोलीस स्टेशन ठाणे पोलिस आयुक्तालय, भारतीय जैन संघटना, देश अपानये व क्रेडाई एमसीएचआय यांचे संयुक्त वतिने सोमवारी सकाळी भिवंडीत 71 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच ज्यांना कोरोना आजाराची  लक्षणे आहेत अशा  कर्मचाऱ्यांची  स्वॅब टेस्टिंग केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली.        

दरम्यान शहरातील निजामपूर येथे  सहा , भोईवाडा येथे नऊ , नारपोली येथे 22 , कोनगाव येथ चार , शांतीनगर 12 , भिवंडी शहरात 19  यांसह नियंत्रण कक्षातील सहा अशा एकूण  78  पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 46 जण कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. तर  32  जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही पोलिस होम क्वारंटाईन आहेत.

In Bhiwandi more than 70 police personnel were infected by coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? अनेक दिवसांपासून मालिकेतून आहे गायब, म्हणाली- तिथे...

Cold Storage Blas: ड्यूप्लिकेट वीरप्पनला अटक! कोल्ड स्टोरेज स्फोटात योगी सरकारची मोठी कारवाई , कोण आहे माजी आमदार अन्सार अहमद

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची SIT कडून सलग सातव्या दिवशी चौकशी

Firozabad to Kolhapur : काकणाचा चुडा, सौभाग्याचं लेणं; बांगड्यांच्या व्यापाराला कोल्हापुरात मोठी मागणी

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

SCROLL FOR NEXT