pankaj ashiya 
मुंबई

भिवंडी महापालिका आयुक्तांची उचलबांगडी, 'हे' असतील नवे आयुक्त

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.

महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांमधून आरोप केले जात असतानाच महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरत असताना राज्य शासनाने तडकाफडकी डॉ. प्रवीण आष्टीकर यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या ठिकाणी नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आसिया या 2016 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सायंकाळी त्यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयातील दालनात येऊन पदभार स्वीकारला आहे.

डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात  झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार रईस शेख व राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवेदन देऊन मागणी केली होती. राज्य शासनाने महानगरपालिका प्रशासन प्रमुख आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी नियुक्तीचे भिवंडीकर नागरिकांनी स्वागत केले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सहकार्य करावे, ही अपेक्षा व्यक्त केली.

Bhiwandi Municipal Commissioner's pickpocket, will be the new commissioner

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT