bhiwandi muncipal 
मुंबई

घरपट्टीबाबत भिवंडी पालिकेने घेतला धाडसी निर्णय, अन् मिळवला अनोखा मान

शरद भसाळे

भिवंडी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी महापालिकेची महासभा ऑनलाईन झूम अॅपवर झाली. कोरोनामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. ही बाब लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील तीन महिन्यांचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतीभा पाटील यांनी केली. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करणारी भिवंडी ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात प्रथमच झूमवर महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष सभागृहात महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त डॉ. पंकज आशिया, उपमहापौर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विरोधी पक्ष नेता यशवंत टावरे, सभागृह नेता विलास पाटील यांच्यासह काही नगरसेवक, नगरसचिव अनिल प्रधान उपस्थित होते. ऑनलाईन महासभेत नगरसेवक सिद्धेश्‍वर कामूर्ती, जावेद दळवी, रिषीका प्रदीप राका, प्रशांत लाड, मनोज काटेकर आदी नगरसेवक गटनेते चर्चेत सहभागी झाले होते. कोरोना काळात शहरातील गरीब-गरजू यांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था, डॉक्‍टर, मनपाचे कर्मचारी व नागरिकांचे महापौरांनी आभार मानले. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा विषय पत्रिकेतील चर्चा करून स्थायी सभापती हलीम अन्सारी यांनी कर माफ करण्याची मागणी केली. सभागृह नेता विलास पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. 

- प्रशासनाला कारवाईचे आदेश 

लॉकडाऊन काळात शहरातील व्यापारी, करदाते, गरीब नागरिक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही. शहरातील नागरिकांना थोडासा तरी आर्थिक दिलासा देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांना तीन महिने मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय महापौर पाटील यांनी यावेळी जाहीर केला. तरी प्रशासनाने त्याप्रमाणे कारवाई करावी, असे आदेश प्रशासनास दिले.

(संपादन : वैभव गाटे)

bhiwandi municipal corporation take decision about tax and water bill

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT