मुंबई

पैशाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर भिवंडीत बलात्कार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

तुषार सोनवणे

मुंबई - भिवंडी शहर पुन्हा एका मोठ्या गुन्ह्यामुळे हादरले आहे. एका 16 वर्षीय मुलीला घरातून पळवून तिला पैसे आणि मौल्यवान वस्तूंचे अमीष दाखवत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अपहरण, बलात्कार, पोस्कोअंतर्गत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. संतोष सोनी आणि इरशाद अन्सारी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे आरोपींच्या हॉटेल आणि पानटपरीवर संताप्त जमावाने काल दगडफेक केली. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पानटपरीवर काम करतो. पीडित मुलीचे 12 नोव्हेंबर रोजी पैसे आणि मौल्यवान वस्तूंचे अमिष दाखवत संतोषने अपहरण केले. त्यानंतर तीला स्वतःच्या घरात कोंडून ठेवले. पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब लक्षात येताच त्यांनी आरोपीला जाब विचारण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी संतोषने त्यांना धमकी देत धक्काबुक्की करीत हाकलून लावले. 

पीडित मुलीच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.  21 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. आणि तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. परंतु वैद्यकीय चाचणीच्या अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. संबधित घटना दिवानशाह परिसरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त जमावाकडून दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

IPL 2026: वैभव सूर्यवंशी भविष्यातील मुंबई इंडियन्सचा खेळाडू... RR vs MI सामन्यानंतर कोणी केला हा दावा? कसं आहे शक्य?

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू, शरीराचे तुकडे; DNA टेस्ट करून पार्थिव कुटुंबाकडे द्या; मुंबई हायकोर्टाचे DDGPला आदेश

Latest Marathi News Live Update: शेतकरी आत्महत्या प्रकरणात मोठा निर्णय; तालुका स्तरावर होणार चौकशी समिती

SCROLL FOR NEXT