mandakini khadse esakal
मुंबई

Bhosari Land Scam : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेना न्यायलायाकडून दिलासा

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनादेखील न्यायालयाने दिलासा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनादेखील न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी मंदाकिनी खडसे यांना 2 लाखांच्या जातमुचलक्यावर अटीसह जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांना काही अटीदेखील घालण्यात आल्या आहेत. त्यांना विनापरवानगी देश सोडून जाता येणार नाही असेही सांगण्यात आले आहे.

पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदीमध्ये पदाचा गैरवापर केल्याचा एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर आरोप होता. या जमिनीची मूळ किंमत 32 कोटी रुपये असून पत्नी मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांनी ती फक्त 3 कोटी रुपयांत खरेदी केली असल्याचे सांगण्यात येत होते.

घटनाक्रम

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 3.1 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती. त्यानंतर हे प्रकरण मागे पडले होते, मात्र आता पुन्हा हे प्रकरण पुढे आल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT