Wadala accident Esakal
मुंबई

Mumbai Rain: वडाळा येथे मोठी दुर्घटना! पार्किंग टॉवर कोसळले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Wadala construction parking lot collapsed : कामगार आणि रस्त्यावरील नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- वडाळा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनविण्यात येत असलेले बांधकाम कोसळले आहे. कामगार आणि रस्त्यावरील नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॅमेऱ्यामध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे. पार्किंग टॉवर रस्त्यावरच कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. टॉवर खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मुंबई, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे.

ताज्या माहितीनुसार, पार्किंग टॉवर पडल्याने त्याखाली तीन ते चारजण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. दोघांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. सुदैवाने टॉवर जेव्हा कोसळले तेव्हा रस्त्यावर फारसे लोक नव्हते. अन्यथा मोठा अपघात झाला असता. यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

घाटकोपर येथे देखील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले, त्यामुळे पेट्रोल पंपाचे छत देखील कोसळले. ही मोठी दुर्घटना असल्याचं बोललं जात आहे. अनेकजण होर्डिंगखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT