Milk Price  Sakal
मुंबई

Milk Price: राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रूपयांचा किमान भाव

गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राहुल शेळके

मुंबई, दि. १४ : उत्पादन खर्च व दुधाला मिळालेला भाव यात ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. हिरवा व कोरडा चारा तसेच पशु खाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. खर्चाच्या तुलनेने दुधाला किमान 35 ते 40 रुपये भाव मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत होती.

दूधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.

राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली होती.

सहकारी आणि खाजगी दूध संघांचा खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चित करण्यासाठी शासन समिती गठीत केली होती.

दूधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर 3 महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्यात यावी.

किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्या मार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी का?

कृषी विद्यापीठांनुसार गायीच्या दुधाचा उत्पादनखर्च प्रति लिटर 28 रुपये असताना आणि लॉकडाऊनपूर्वी दुधाला 32 रुपये दर मिळत असताना  मोठा तोटा सहन करून शेतकऱ्यांना दूध विकावे लागले.

लॉकडाऊन काळात 18 ते 20 रुपये प्रति लिटर इतक्या नीचांकी दराने खरेदी केलेल्या दुधातून विविध कंपन्यांनी व दूध संघांनी दूध पावडर बनवली. त्याचे मोठे साठे करून ठेवले.

आज दूध पावडरचे दर 300 रुपयाच्या पलीकडे गेले असताना स्वस्तात दुध घेऊन तयार केलेल्या दूध पावडरच्या विक्रीतून या कंपन्या व दूध संघ अमाप नफा कमवत असून  शेतकऱ्यांना मात्र या नफ्यामध्ये सहभागी करून घेण्याची त्यांची तयारी दिसत नसल्याचा दावा डॉ. अजित नवले यांनी केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT