Postponement of Municipal Staff Nurse Recruitment sakal
मुंबई

Govt Decision: कोविड काळात काम केलेल्या परिचारिकांना सरकारचं गिफ्ट; आरोग्य विभागाच्या सेवेत कायम होणार

आरोग्य विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोविड काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या परिचारिकांना शासनानं मोठं दिलासा दिला आहे. ५९७ परिचारिकांची कायमस्वरुपी शासकीय सेवेत नियुक्ती होणार आहे. आरोग्य विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे. (big relief to nurses who had worked in Covid time will continue in govt service of health department)

कोविडच्या काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्यानं मोठ्या प्रमाणावर परिचारिकांची तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात आली होती. यांपैकी ५९७ परिचारिकांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

या परिचारिकांना कोविड काळात ११ महिन्यांच्या कंत्राटी कामावर घेण्यात आलं होतं. पण कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांचा करार पुन्हा वाढवण्यात आला होता. पण यानंतर त्यांना सेवेतून पायउतार व्हावं लागणार होतं. या परिचारिकांनी अनेकदा मागणी देखील केली होती की आम्हाला कायमस्वरुपी सामावून घ्या.

हे ही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

जीवाची बाजी लावून या परिचारिकांनी कोविडच्या काळात लोकांची सेवा केल्यानं केंद्राची परवानगी घेत राज्य शासनानं या परिचारिकांना राज्य शासनाच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT