कासा (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्यमार्गावर गंजाड लोठीचा देवपाडा येथे राज्य परिवहन मंडळाची बस व दुचाकी यांची धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक जबर जखमी होत मृत्युमुखी पडला. गंजाड येथे रहिवासी कैलास भुरकुड (वय २६) हा मिस्त्री काम करत होता. तो कामासाठी डहाणू येथे दुचाकीवरून मंगळवारी (ता. २१) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जात असताना कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसला धडक देत अपघातग्रस्त झाला. या घटनेची माहिती डहाणू पोलिसांना कळताच त्वरित पोहोचत मृतदेह डहाणूतील कॉटेज रुग्णालयात नेण्यात आला. पुढील कारवाई सुरू आहे, असे सांगण्यात आले. मृत्यमुखी पडलेल्या कैलास याचे नुकतेच लग्न झाले असून त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.