मुंबई

जुन्या कपड्यांनी उलगडला कोट्यावधींचा कर गैरव्यवहार; बोगस कोडवरून चढ्या भावाने निर्यात

अनिश पाटील



मुंबई ः  बनावट आयात-निर्यात कोडच्या मदतीने चढ्या भावाने निर्यात केल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने जोगेश्वरीतील एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक केली. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत 58 संशयीत कोडवरून 291 कोटींची निर्यात केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

आदेश सापळे(44) असे अटक आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी पूर्व येथील केवस् रोड येथील रहिवासी आहे. तो स्काय टच एव्हीएशन कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली. आरोपीने निर्यात गैरव्यवहार करण्यात साठी बनावट आयात निर्यात कोड वापर केला. आरोपीने एकूण 58  बोगस आयात निर्यात कोडचा वापर केला असून त्यातील 22 कोड अस्तित्त्वात नसल्याचे  तपासात निष्पन्न झाले. त्यातून एकूण 292 कोटी किमतीच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली आहे. अस्तीत्त्वात नसलेल्या 22 आयात निर्यात क्रमांकावरून 145 कोटींची निर्यात करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये 14 कोटींचा जीएसटी व अडीच कोटींचा कर परतावा  घेण्यात आल्याचे सीमाशुल्क विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दक्षिण आफ्रीकेत, आखाती देशात कार्गोमधून कपडे चालले होते. संशयावरून सीमा शुल्क विभागाने या मालाची तपासणी केली असता आतील कपडे जूने असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी या माल पाठवत असलेल्या प्रीन्स एन्टरप्रायझेसच्या 16 संशयीत बिलांची तपासणी केली होती.

त्यानंतर त्यांनी त्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात भेट दिली असता तेथे अशी कंपनी अस्तित्त्वात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी सीमाशुल्क ब्रोकरकडे चौकशी केली असता आरोपीचे नाव याप्रकरणी पुढे आले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. तो या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सीमाशुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT