मुंबई

Birds Flu | मुंबईत कावळे-कबूतरांच्या मृत्यूच्या घटना; मात्र कोंबड्यांची माहितीच नाही

समीर सुर्वे

मुंबई  : मुंबईत कावळे आणि कबूतरांचे मृत्यू झाल्याच्या घटना आज घडल्या. पक्ष्यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे दोन दिवसांत 170 दूरध्वनी आले आहेत; मात्र अद्याप कोंबड्यांच्या मृत्यूची माहिती आली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले; तर मटण विक्रेत्यांना मुखपट्ट्या (मास्क) आणि हातमोजे (ग्लोव्हज्‌) घालण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 

मुंबईतील चेंबूर टाटा कॉलनीतील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट होताच महानगरपालिकेने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पथक तयार केले आहे. यात मृत पक्षी आढळल्यास महानगरपालिकेच्या 1916 या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेकडे आजवर 170 च्या आसपास दूरध्वनी आले आहेत. यात प्रामुख्याने कावळे आणि कबूतरांच्या मृत्यूंची माहिती देण्यात आली. काही ठिकाणी एकदोन पक्ष्यांच्या मृत्यूचेही दूरध्वनी आले आहेत, अशी माहितीही देण्यात आली. या पक्ष्यांना पुरण्यात येत असून त्यात चुनखडीचा वापर केला जात आहे. 

मुंबईत अद्याप कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रकार घडलेले नाहीत. मुंबईत कुक्कुटपालन केंद्रे नसल्याने तशी भीतीही नाही; मात्र तरीही कोंबड्यांचे मांस विकणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची सूचना महापालिकेने केली आहे. 
 

Birds Flu Crow pigeon deaths in Mumbai But the hens dont know

------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT