..'या' कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या फलकांमुळे एकच खळबळ! 
मुंबई

..'या' कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या फलकांमुळे एकच खळबळ!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (अभीष्टचिंतन) देणारे फलक ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात लागल्याने रविवारी खळबळ उडाली.   

ही बातमी वाचली का? म्हणून खोपोलीतील शेकडो नागरिक रस्त्यावर
     
छोटा राजन सध्या कारागृहात शिक्षा भोगत असतानाही ठाण्यातील गडकरी रंगायतन, कळवा नाका आणि धर्मवीरनगर (तुळशीधाम) येथील ठाणे महापालिकेच्या टीएमटी बस थांब्यावर ही अनधिकृत फलकबाजी करण्यात आली. याबाबत ठाणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. दरम्यान, राज्यात सरकार बदलल्यानंतर गुंडांचे उद्दात्तीकरण सुरू झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाण्यात ठिकठिकाणी कुख्यात गुंड छोटा राजन याच्या अभीष्टचिंतनाचे फलक ठिकठिकाणी झळकल्याने खळबळ उडाली. छोटा राजनचा वाढदिवस १३ जानेवारी रोजी आहे. या पार्श्‍वभूमीवर राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील टीएमटी बस थांब्यावर, कळवा नाका आणि घोडबंदर रोडवरील धर्मवीरनगर या ठिकाणी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले. या फलकांवर सी. आर. सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य असा उल्लेख असून आधारस्तंभ राजेंद्र सदाशिव निकाळजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या फलकावर शुभेच्छुक म्हणून संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष प्रकाश भालचंद्र शेलटकर यांच्या नावासह संघटनेच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष संगीताताई शिंदे, मुंबई शहर अध्यक्ष राजाभाऊ गोळे आणि संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट हेमचंद्र ऊर्फ दादा मोरे आदींची छबी झळकत होती. 

कोण आहे छोटा राजन?
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन ऊर्फ नाना याच्या छोटा राजन या नावावरून सी. आर. (छोटा राजन) नावाची सामाजिक संघटना स्थापन करण्यात आली आहे. हत्या, खंडणीसह धमकावणे आदी विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या छोटा राजन याला मुंबईतील एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येप्रकरणी परदेशात अटक करण्यात आली. तेव्हापासून छोटा राजन तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीस छोटा राजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT