Thane : गायमुख घाटात विचित्र अपघात; ३ जण जखमी 
मुंबई

Thane : गायमुख घाटात विचित्र अपघात; ३ जण जखमी

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात झालेल्या विचित्र अपघातात एकाच गाडीत तीन जण अडकून पडले होते

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात झालेल्या विचित्र अपघातात एकाच गाडीत तीन जण अडकून पडले होते. तर या अपघातात पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अडकून पडल्यांमध्ये कार चालक विनोद खरात (३०) यांच्यासह सृष्टी पाटील (१८) आणि पांडुरंग पाटील (४५) या तिघांची जवळपास काही तासांमध्ये सुटका करून त्यांना मीरा भाईंदर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ही घटना रविवारी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या अपघातात रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.

रविवारी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास मे पारस पेट्रो प्रा.ली.च्या मालकीचा ऑईलने भरलेला टँकर चालक घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी अनोखली चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यामुळे घोडबंदर कडे जाणाऱ्या एक ट्रकसह तीन चारचाकी वाहनांवर गायमुख घाटात घोडबंदर कडे जाणाऱ्या वाहिनीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये एका कारमध्ये तिघे जण अडकून पडले होते. या अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह वाहतूक पोलीस, ठाणे व मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकांचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तसेच या अपघातात कोणी जखमी झाले आहे का? याची पाहणी केली त्यावेळी एका गाडी तिघे अडकल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि त्यांची काही तासात यशस्वीपणे सुटका केली. त्या तिघांना गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन कार, एका ट्रक आणि टँकरचे नुकसान झाले आहे.

यावेळी ठाणे अग्निशमन दलाचे दोन इम्र्जेंसी टेंडर, एक फायर वाहन, एक क्यूआरव्ही, मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन, एक क्रेन, तीन हायड्रा, एक जेसीबी, तीन रुग्णवाहिकांना पाचारण केले होते. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT