वसई - वालीव पोलिस ठाण्याच्या आवारात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
वसई - वालीव पोलिस ठाण्याच्या आवारात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. 
मुंबई

वसईत भाजपची दादागिरी; पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण

सकाळवृत्तसेवा

नालासोपारा - केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास वसई येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी वसई-विरार भाजपचे जिल्हाध्यक्ष बिजेंद्र कुमार यांच्यासह सहा कार्यकर्त्यांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे; मात्र भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी वालीव पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले.

रणजित सिंग, नितीन पाठक, अंशुमन सिंग, विकास सिंग, सूर्यकांत वाघमारे, बिजेंद्रकुमार झिंझोटर आणि सौरभ शहा असे गुन्हा दाखल झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास वसईच्या तुंगारेश्‍वर येथे यातील आरोपी रणजित याला काही अनोळखी इसमांकडून मारहाण करण्यात येत होती. या वेळी गस्तीवर असलेले वालीव पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन बावधाने आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र या वेळी आरोपी नितीन पाठक याने पोलिसांनाच शिवीगाळ करून धक्काबुकी केली. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना वालीव पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतरही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पोलिसांना शिवीगाळ करून धमकावणे, आरडाओरड करण्याचे प्रकार सुरूच होते. याप्रकरणी भाजपच्या सात जणांना अटक करण्यात  आली.

पोलिस ठाण्याच्या आवारातच भाजपचा ठिय्या
भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे असून, याप्रकरणी पोलिसांवर तत्काळ कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांना भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असून, याप्रकरणी चौकशीचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांनी तुंगारेश्‍वर येथे मारहाण करणाऱ्यांना पोलिस ठाण्यात आणले; मात्र पोलिसांनीच त्यांना सोडून दिले, असा आरोप या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.

भाजपच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल
भाजप पदाधिकारी दादागिरी करत पोलिस ठाण्यात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यात भाजपच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT