Ashish Shelar-Kishori Pednekar
Ashish Shelar-Kishori Pednekar google
मुंबई

आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणात आशिष शेलार यांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द (Offensive statement) बोलल्याबद्दल भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये (Marine Drive Police station) गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला होता. या प्रकरणात आता आशिष शेलार यांना जामीन मिळाला आहे. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काल किशोरी पेडणेकर यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ आशिष शेलार यांच्या विरोधात भादवीच्या कलम 354 अ (4) आणि 509 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता, त्यानंतर आज दुपारी आशिष शेलार स्व:ताच जबाब नोंदवण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला पोहोचले होते, जबाब नोंदवल्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही

माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत, मी महापौर किंवा कोणत्याही महीलेबद्दल असे अपमानास्पद शब्द बोललेलो नाही, असं आशिष शेलार जामीन मंजूर झाल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : तब्बल 10 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल

T20 World Cup स्पर्धेसाठी संघात संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

Loksabha Election : बॉँबस्फोटातील आरोपी प्रचारात ; भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Sakal Podcast: नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

SCROLL FOR NEXT