Ashish-shelar
Ashish-shelar  Sakal BJP
मुंबई

भरती नसताना मिठी नदीला पूर...,'मुंबईसाठी धोक्याचा इशारा'?- आशिष शेलार

मिलिंद तांबे

मुंबई : भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात (Water Filtration) पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला (Mithi River) पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेली 25 वर्षे मी लोकप्रतिनिधी (Leader) म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी (Mumbai) भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केली. (BJP Ashish Shelar pointed Mithi River Flood As Future Danger of Mumbai-nss91)

आमदार आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर सविस्तर भाष्य केले. मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडूपच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरले. 26 जुलैच्या पावसातही भांडूप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही शेलार म्हणाले.

मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली 25 वर्षे काम करत आहे. माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असंही ते म्हणाले.

नरबळीचा प्रस्ताव आणणार का?

एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का? असा संतप्त सवाल ही आमदार शेलार यांनी केला केला आहे. हा राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने 112 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही 31 लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात पाटावर आणून ठेवायचं आहे काय? शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT