Ashish Shelar on Thackeray Government sakal media
मुंबई

Mumbai Rain : तोच 'परिवार' मुंबईकरांचा खरा गुन्हेगार! शहरातील गटरी तुंबताच भाजपचा हल्लाबोल

रोहित कणसे

मुंबईत पाऊस येण्याआधी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे आरोप केले जात आहेत. यादरम्यान राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. तसेच मुंबईतील नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी आलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नालासफाई वरून राजकारण तापताना दिसत आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुंबलेल्या गटारावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर हल्ला चढवला आहे.

जेव्हा मुंबईत नालेसफाई सुरू होती, भाजपाने उन्हातान्हात उतरुन पहाणी करुन नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असे शेलार म्हणाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटावर अनेक गंभीर आरोप त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहेत.

वर्षानुवर्षांचे तेच कंत्राटदार, तीच पध्दत, तीच अपारदर्शकता, अधिकाऱ्यांची तीच लपवाछपवी, त्यामुळे कालच्या पहिल्या पावसातच पालिकेचे दावे वाहून गेले आहेत असे शेलार म्हणाले आहेत. तसेच पालिकेने अजूनही कंत्राटदारांची बाजू न घेता, काही उपाययोजना करता आल्या तर करव्यात. वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदारांची काळजी केली, आता मुंबईकरांची काळजी करावी!

"बाकी, मुंबईकरांचे तथाकथित रखवालदार उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे माजी नगरसेवक, माजी महापौर या काळात गायब होते आणि उबाठा प्रमुख लंडनमध्ये तेव्हा थंड हवा खात होते. त्यामुळे उबाठाने वर्षानुवर्षे पोसलेल्या कंत्राटदारांमुळे यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत जी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी उबाठा गटाने आपल्या तोंडाची "गटारे" बंदच ठेवावीत! उबाठा आणि उबाठाचे पाळीव कंत्राटदार हा जो एक "परिवार" तयार झालाय, तोच मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!" अशा शब्दात शेलारांनी उध्दव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT