मुंबई

"लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त..."; शिवसेनेला टोला

भाजपच्या अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडीवर साधला निशाणा

विराज भागवत

भाजपच्या अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडीवर साधला निशाणा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ता शनिवारी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर तर निशाणा साधतालाच पण त्याशिवाय, आपला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. 'अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की सध्या कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिलात, तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील', असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. याच मुद्द्यावरून 'लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत', अशा शब्दात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांना टोला लगावला.

"एकमेकांशी लढून, गरळ ओकून, सत्तेसाठी एकत्र आलेल्यांच्या गळ्यात लोक काय हारतुरे घालणार आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधात लढले तर लोक जोड्याने मारतील...भीती खरीय. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत. फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे", अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्याचसोबत, तिघाडी सरकार असा हॅशटॅगही वापरला.

नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"सध्या अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एकहाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील. स्वबळाचा नारा काय देता... माझ्या रोजीरोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे नारे देणाऱ्यांना सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT