Chandrashekhar Bawankule on Balasaheb Thorat Resignation 
मुंबई

Chandrashekhar Bawankule: थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, तांबेंना दिली खुली ऑफर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Balasaheb Thorat News: नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत त्यांनी तांबेंसह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. (BJP Bavankule big statement on Balasaheb Thorat resignation gives open offer to Satyajeet Tambe)

बावनकुळे म्हणाले, स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबेंना मदत करुन त्यांना विधानपरिषदेत भाजपनं मदत केली. त्यामुळं सत्यजीत तांबेंना आम्ही ऑफर दिलेली नाही, पण त्यांना जर वाटलं तर भाजपत त्यांना प्रवेश करायचा आहे. तर त्यांचं स्वागत आहे, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत.

आम्ही आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणं. पण सत्ता हे आमच्यासाठी साध्य नाही साधन आहे हा भाजपचा मूलमंत्र आहे. बाळासाहेब थोरातांना मी व्यक्तिगत ओळखतो.

त्यांच्या रक्तात काँग्रेस असून त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं, अशा वेळी नेतृत्वाला नाराजी येत असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT