Loksabha Election sakal
मुंबई

Loksabha Election : बॉँबस्फोटातील आरोपी प्रचारात ; भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा प्रचार १९९३ च्या बॉँम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा प्रचार १९९३ च्या बॉँम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहे.

त्याचबरोबर लष्कर भरतीचे पेपर फोडणारा आरोपी महेंद्र सोनावणे हाही या पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाने लक्ष्य केले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी याबाबत म्हटले आहे की, कॉँग्रेसच्या संगतीत राहून उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील शेकडो निष्पापांचे जीव घेणाऱ्या आरोपींसोबत या पक्षाचा प्रचार पाहून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील.

मुंबईकर या पक्षाला धडा शिकवतील. शरद पवारांनी काँग्रेस पक्षात इतर प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असे म्हटले होते. त्याबाबत डॉ. वाघमारे म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष व आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या कारस्थानाचे सूत्रधार शरद पवार आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT