मुंबई

अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा; भाजप आक्रमक

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा

तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नालासोपारा (मुंबई) : नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेने काल दिवसभरात राज्यात खळबळ उडाली होती. परंतु राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या दबावावरुन राणे यांना अटक केली आहे. तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओ चा दाखला देत नालासोपारातील राणे समर्थक भाजप कार्यकर्ते संतप्त झाले असून, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ही सत्तेचा गैरवापर केल्या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तुलिंज पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.

वसई विरार भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष विश्वास सावंत यांनी मध्यरात्री 12 च्या सुमारास आपल्या शिष्टमंडळासह तुलिंज पोलिसांना तसे निवेदन दिले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणासह येत्या वसई विरार महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अपशद्ब वापरल्या प्रकरणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्या नंतर, त्यांना अटक करण्यासाठी नाट्य रंगल्या जात होते. सकाळ पासूनच नाशिक, पुणे पोलिस राणे यांना अटक करण्यासाठी निघाले अशा बातम्या समोर येत होत्या. या सर्व घडामोडी प्रसंगीच रत्नागिरी येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषद सुरू होती. या पत्रकार परिषद वेळी माईक बाजूला सारुन, नारायण राणे यांना अटक करण्यासंदर्भातील मोबाईल संवाद अनिल परब करत असतानाच ते पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्या बाजूला आ भास्कर जाधव ही आहेत.

हा व्हिडीओ वृत्तवाहिनी, सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी मंत्र्याने आपल्या सत्तेचा गैरवापर करून, राणे यांना अटक करण्यास भाग पाडल्याचा आरोप भाजपाचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांनी करून, व्हिडीओ चा दाखला देत नालासोपा-यांच्या तुलिंज पोलिस ठाण्यात निवेदन देऊन अनिल परब यांच्यावर तात्काळ कारवाही करावी अशी मागणी केली आहे. सावंत यांच्या मागणीने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आदेश दिल्या नंतर मुंबई सह वसई विरार नालासोपाऱ्यात नारायण राणे विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन, राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. नालासोपारा पूर्व तुलिंज येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालया समोर शिवसैनिकांनी राणे यांच्या फोटोला चपला ने मारून निषेध व्यक्त केला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर राणे यांचे बॅनर फाडण्यात आले. राणे यांच्या अटकेनंतर जामीन होताच मध्यरात्री राणे समर्थक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांनी तुलिंज पोलिसांना निवेदन देऊन, अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडी ने नालासोपा-यात सुद्धा राणे समर्थक भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत जंगी राजकीय खडाजंगी होण्याचीही चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT