Kapil Patil sakal
मुंबई

Kapil Patil : हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवा, मग होईल दूध का दूध, पानी का पानी

भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांचं स्वपक्षीय आमदार किसन कथोरे यांना खुले आव्हान

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - काही जणांना वाटतं, की आम्ही आहोत म्हणून भाजप आहे, पण तुमची इतकी ताकद असेल, हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवा. मग होईल दूध का दूध, पानी का पानी', असं म्हणत भाजपाचे माजी खासदार कपिल पाटील यांनी त्यांच्याच पक्षाचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांना नाव न घेता खुले आव्हान दिलं आहे.

मुरबाड विधानसभेचे भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यात मागील अनेक वर्षांपासून वितुष्ट असून त्यातूनच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी मुरबाडमध्ये निष्ठावंतांचा मेळावा घेत गटबाजीचं उघडपणे प्रदर्शन केलं. याच मेळाव्यात त्यांनी कथोरे यांना हे आव्हान दिलं.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवाचं खापर कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किसन कथोरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न कपिल पाटील गटाकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय.

बारवी धरणाचे प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी ८ वर्ष वणवण करत होते, मात्र माझ्याकडे ते आल्यानंतर ८ महिन्यात त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. तसंच आज जी भूमिपूजनं केली जात आहेत, त्यातली अनेक कामं मी केली असून सध्या फक्त श्रेय घेण्याचं काम सुरू असल्याची टीका कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर नाव न घेता केली. तसंच सध्या सुरू असलेली भूमिपूजनं पाहता मागील ८ वर्षात न झालेली सगळी कामं आत्ताच होत आहेत का? असा टोलाही त्यांनी लगावला.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : ताशी १८० किमी वेगाने धावली वंदे भारत ट्रेन, इंजिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातून एक थेंबही पाणी सांडले नाही, पाहा व्हिडिओ

Leopard Viral Video : गाईला बघून घाबरला बिबट्या, सीसीटीव्ही फुटेज पाहून म्हणाल; कोल्हापुरी नाद खुळा...

Latest Marathi Live Update News: आयटी दांपत्य फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई? आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Video Viral: किंग्स चार्ल्ससोबत फोटो नाही मिळाला अन् तेव्हाच निर्धार केला... वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षक अमोल मुझूमदारने सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरणादायी किस्सा

प्रणित मोरे आज बिग बॉसच्या घरात येणार? BB19 बाबत मिळाले नवीन मोठे अपडेट्स, तब्येत सुधारणा झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT