Sanjay Raut
Sanjay Raut  e sakal
मुंबई

भाजपनं महाराष्ट्रात स्वतःची कबर खोदून ठेवलीए - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपने महाराष्ट्रात स्वतःची कबर खोदून ठेवली आहे तसेच देशातही ते हेच करत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई विमानतळावर शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान, दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या संजय राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. (BJP has dug its own grave in Maharashtra Sanjay Raut slam)

राऊत म्हणाले, "हे शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन नाही. ही लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे. आज आयएनएस विक्रांतप्रकरणी जो घोटाळा झाला आहे त्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानं आज महाराष्ट्रातील गावपातळीवर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन शिवसेना आणि इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. ही सुरुवात असून आता ठिणगी पडलेली आहे. यापुढे जसजशी भाजपची पावलं पडतील तशी आमची पावलं पडतील. मी फक्त निमित्त आहे, महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्या राजकीय कार्यकर्त्यांवर नेत्यांवर तसेच भाजपच्या राजकीय विरोधकांवर कारवाया सुरु आहेत. पवार साहेबांनी याबाबतची तक्रार पंतप्रधानांकडं मांडली आहे"

केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे हे आमच्यावर हल्ले करतात. आमच्यावर कारवाई करुन करुन काय करणार? तुरुंगात टाकतील, ठार मारतील. यासाठीही आम्ही तयार आहोत. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदून ठेवली आहे, हीच कबर तुम्ही देशातही खोदून ठेवत आहात. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असाल तर आम्ही त्याविरोधात बोलत राहू, असंही राऊत यावेळी म्हणाले.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारला सवाल

भाजपचे जे वरिष्ठ हिंदुत्ववादी नेते आहेत ते आएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी जाब विचारतील, असं वाटलं होतं. पण त्यांनी हे विचारलेलं नाही. त्यांच्याकडं याचं उत्तर असू शकत नाही. कारण आम्ही पुराव्यासहित घोटाळा बाहेर काढला आहे. राज्यसभेत त्यांच्या पक्षाचे खासदार यावर बोलू शकत नव्हते, त्यामुळं त्यांनी राज्यसभाच तहकूब केली. राष्ट्रभक्तीच्या नावावर यांनी लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आणि ते निवडणुकीत वापरले. पीएमसी बँकेच्या माद्यमातून सोमय्यांनी त्याचं मनी लॉंडरिंग केलं, असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला. आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळं जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा कारवाई करावीच लागते, असंही राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT