local 
मुंबई

'बिनधास्त लोकलने प्रवास करा'; भाजपचे आंदोलन तीव्र

कार्तिक पुजारी

कांदिवलीत अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात भाजपने आंदोलन सुरु केले आहे. लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात यावा यासाठी भाजपचे आंदोलन होत आहे. दोन लस घेतल्यांना आणि पत्रकारांना लोकल प्रवासास मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपची आहे.

मुंबई- कांदिवलीत अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात भाजपने आंदोलन सुरु केले आहे. लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात यावा यासाठी भाजपचे आंदोलन होत आहे. दोन लस घेतल्यांना आणि पत्रकारांना लोकल प्रवासास मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपची आहे. भाजप नेते लोकलने प्रवास करणार आहेत. तसेच दोन डोस घेतलेल्यांनीही प्रवास करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. लोकल प्रवासावरुन भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. सरकारने लोकल प्रवासाला परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

भाजप मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. यावेळी रेल्वे स्टेशनजवळ भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. कांदिवली, चर्चेगेट, दहिसर याठिकाणी आंदोलन तीव्र झाले आहे. भाजप नेते रेल्वे प्रवास करुन सविनय कायदेभंग करत आहेत. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न होत आहे.

प्रविण दरेकर आणि मंगलप्रभात लोढा हेही आंदोलनात सहभागी झाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर म्हणाले की, 'सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची सेवा मिळायला हवी. भाजप यासाठी तीव्र आंदोलन करेल. आम्ही रेल्वने प्रवास करणार असून सविनय कायदेभंग करण्यात येईल.' यावेळी अतुल भातखळकर म्हणाले की, आम्ही २ ऑगस्टपर्यंत वाट पाहिली. त्यांना पत्र लिहिली. पण, सरकारने काहीही पाऊलं उचललं नाही. त्यामुळे आमचे लोकांना आवाहन आहे की दोन डोस घेतलेल्यांनी बिनधास्त लोकलने प्रवास करावा. रोखण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही प्रवास करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT