Chandrakant Patil Google
मुंबई

भाजप-मनसे युती शक्य? चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

कार्तिक पुजारी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) यांनी आज कृष्णकुंजवर जात मनसे प्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत

मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) यांनी आज कृष्णकुंजवर जात मनसे प्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप-मनसे युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसे-भाजप युतीचा कसलाही प्रस्ताव नाही. नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंशी अनपेक्षित भेट झाली होती. त्यांनी निवासस्थानी घेऊन भेटण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती. (Maharashtra Latest Marathi News)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'नाशिकला असताना माझी आणि राज ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी मला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याचा स्वीकार मी केला आणि आज चहा पिण्यासाठी आलो होतो. राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही. त्यांनी मला एक व्हिडिओ ऐकायला सांगितला होता. तो मी ऐकला. उत्तर प्रदेशात तो व्हायरल झाला होता. चर्चा झाली पण ती युतीची झाली नाही. एकमेकांच्या भूमिकांविषयी चर्चा झाली. एक माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. ते परखड असले तरी थोडे लवचिकही आहे. पण, आज युतीच्या संबंधात कसलीही चर्चा झाली नाही.'

माझ्या मनातील प्रश्न राज ठाकरेंसमोर उपस्थित केले. प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. मी त्यांच्याकडे भूमिका बदलण्याचा आग्रह करत आलो आहे. उत्तर प्रदेशातील मानसाला उत्तर प्रदेशातच ८० टक्के नोकऱ्या मिळायला पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणतात. आम्हाला इथे तसंच व्हावं वाटतं. आम्ही निरोप घेताना 'पुन्हा भेटू' असं म्हटलो. याला कसलीही राजकीय किनार नव्हती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी काहीही चर्चा झाली नाही. राज ठाकरेंना त्यांची विचार व्यापक करण्यास सांगितलं. त्यांच्या मनात परप्रातियांबाबत कसलीही कटुता नाही. ती भूमिका व्यवस्थितपणे मांडण्यात सांगितलं असल्याचं चंद्रकात पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udgir News : उदगीर-लातूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू

Global Warming and Polar Ice Caps : अंटार्क्टिकातील हिमनद्या; पृथ्वीच्या संतुलनाचा मौन संरक्षक

Marathi Theatre BTS stories : चारशे तीस सव्वीस ऐंशी

International Women’s Day : कवेत अंबर घेण्यासाठी

Indian Cricket Pitch Analysis : खेळपट्टीवरील मातीची करामत!

SCROLL FOR NEXT