devendra fadanvis esakal
मुंबई

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम? दिल्लीला रवाना, मोदी-शहांची घेणार भेट!

Devendra Fadnavis visit to Delhi: फडणवीस मोदी-शहा यांच्यापुढे आपल्या राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- बुधवारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर आज फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीमध्ये ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस मोदी-शहा यांच्यापुढे आपल्या राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ९ जागांवर समाधानी राहावं लागलं आहे. भाजपच्या १४ जागा कमी झाल्या आहेत. या अपयशाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याची तयारी दाखवली.

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर भाजप नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या पराभवाची कारणमिमांसा केली. तसेच, पराभवाची जबाबदारी स्वीकारत, पदावरुन मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली.

जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो. आता विधानसभेसाठी पूर्ण तयारी करायची आहे. त्यामुळे मला सरकारमधून मुक्त करण्यात यावं. अशी विनंती केंद्राकडे करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चाला तोंड फुटले आहे. त्यातच आता फडणवीस आज दिल्लीला जाणार असल्याने ते खरंच राजीनामा देणार का अशी चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारतील अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यामध्ये मंत्रिपद दिलं जाईल असंही बोललं जात आहे. मात्र, आज दिल्लीत गेल्यानंतर फडणवीस यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे. भाजपचे हायकंमांड यावर काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT