मुंबई

ठाकरे सरकारला सातत्याने धारेवर धरणारे किरीट सोमय्या अडचणीत?

पूजा विचारे

मुंबई: विरोधकांची पोलखोल करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता स्वतः अडचणीत सापडले आहेत.  किरीट सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या याची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी करण्यात आली आहे. नील सोमय्या यांच्याविरुद्ध खंडणीचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली.

नील सोमय्या यांच्यावर एका जुन्या प्रकरणात खंडणीचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मुलुंड पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मुलुंड पोलिस ठाण्यात त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. जवळपास ४ तास चौकशी झाल्यानंतर नील सोमय्या यांना घरी सोडण्यात आलं. दरम्यान येत्या काळात या प्रकरणावरुन त्यांची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर घणाघाती आरोपांसाठी ओळखले जातात. ते सातत्याने सरकारच्या त्रुटी शोधून काढताना दिसतात.  गेल्या काही काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी समोर आली आहेत.

 bjp leader kirit somaiya son neil somaiya extortion case mulund police interrogate 4 hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT