मुंबई

कोरोना देशमुखांना झालाय की त्यांच्या मेंदूला झालाय; भाजपची जहरी टीका

कृष्ण जोशी

मुंबई: देशाचे भूषण असलेल्या भारतरत्न गानकोकिळा लतादीदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देशहितासाठी केलेल्या ट्वीटची चौकशी करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. हे विधान ऐकून कोरोना त्यांना झालाय की त्यांच्या मेंदूला झालाय, असा प्रश्न पडतो, अशी जळजळीत टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

तेंडुलकर, लता मंगेशकर आणि अन्य काही सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेली ट्वीट सारखीच असल्याने त्यांच्यावर यासंदर्भात कोणी दबाव आणून ही ट्वीट करायला लावली का, याची चौकशी करण्याचे देशमुख यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यासंदर्भात भातखळकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून कठोर टीका केली आहे.

केवळ मत्सर आणि द्वेषापोटी हे महाभकास आघाडी सरकार महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भूषण असलेल्या मान्यवरांविरोधात काहीही कारण नसताना कारवाई करू पहात आहे. यावरून या सरकारचे डोके किती फिरले आहे हे तर स्पष्ट होतच आहे, पण कोरोना नेमका कोणाला झालाय, अनिल देशमुखांना की त्यांच्या मेंदूला, असा प्रश्न पडत असल्याची जळजळीत टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP leader MLA Atul Bhatkhalkar criticized Home Minister Anil Deshmukh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT