Atul Bhatkhalkar vs Uddhav Thackeray esakal
मुंबई

'मुख्यमंत्री पदाची माळ घालून उद्धव ठाकरेंनी मतदारांशी गद्दारी केली'; आमदार भातखळकरांची सडकून टीका

शिवसेनेने २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकानंतर भाजपचा घात केला.

सकाळ डिजिटल टीम

देशभरातील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले. भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आसूड ओढले. ते म्हणाले, मागील अनेक दशके भाजपसोबत (BJP) असलेल्या शिवसेनेने २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकानंतर भाजपचा घात केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी महाविकास आघाडीशी समझोता केला. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री पदाची माळ घालून त्यांनी मतदारांशी गद्दारी केली, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हा आणि वसई विरार जिल्ह्याच्या वतीने काल (रविवार) ढेकाळेमधील द फर्न हॉटेल येथे पालघर (Palghar) लोकसभा क्षेत्र आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते बाबाजी काठोळे, राजन नाईक, मा. आ. विलास तरे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, शेखर धुरी, मनोज पाटील, मनोज बारोट आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित पत्रकारांची संवाद साधला आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पालघर जिल्ह्यातील मतदारांनी नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सावरा यांना भरघोस मतदान करून भाजपला चांगला विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, देशभरातील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले. भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. विकासाच्या दिशेने पुन्हा एकदा कामाला लागलो आहोत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा विचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : संजय राऊत यांचा 'वंदे मातरम्' वरुन सरकारवर निशाणा

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT