narayan-rane.jpg 
मुंबई

मी मातोश्रीत बसतो, तुम्ही तुमच्या घरी बसा, मग खायचं काय? - नारायण राणे 

दीनानाथ परब

"मुख्यमंत्री लॉक डाऊन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे दोन मित्र पक्ष एवढे उतावळे झालेले नाहीत. माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे  धोरण त्यांना पेलवलं नाही. म्हणून कोविड रुग्ण वाढले. इतर राज्यात कोविडचे रुग्ण कमी झाले. मग महाराष्ट्रात कसे वाढले?" असा सवाला भाजपाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी विचारला आहे. नारायण राणे यांनी लॉकडाउनच्या निर्णयाला विरोध केला आहे. आता सर्वबाजुंनी लॉकडाउनला विरोध सुरु झाला आहे. आता उठाव झाल्यानंतर घाबरले, असे नारायण राणे म्हणाले. "शिस्तपाळा नाही, तर लोकडाऊन करू अशी धमकी  देतात. आपण काय बोलतोय, याचा विचार करा, नागरिकांना मान, सन्मान देऊन बोललं पाहिजे" असं राणे म्हणाले. 

मी मातोश्रीत बसतो, तुम्ही तुमच्या घरी बसा, मग खायच काय?. दोन वेळेचं जेवणाच पॅकेट मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरी देणार आहेत का? म्हणून लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असे राणे म्हणाले. 

"सर्व उद्योग कोलमडलेत. अधिकाऱ्यांचं काम फक्त मंत्र्यांना कमवून देण्याचं उरलं आहे. सचिन वाझे एपीआय होता. त्याच्या गाड्या किती? ऑबेरायमध्ये वाझे याच्या सोबत एका बाईचा व्होडिओ आहे. कोण ही बाई काय करायची? दिशा सालियन, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन अशा किती हत्या झाल्या? कोणीतरी गॉड फादर असल्याशिवाय असणार आहे का हे? असा सवाल राणेंनी विचारला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT