मुंबई

शिवसेनेचे स्पिरीट मेले; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Coffee with Sakal कार्यक्रमात व्यक्त केलं मत

मुंबई: पूर्वीची शिवसेना आता उरलेली नाही. त्यावेळी सामाजिक बांधिलकी आणि अस्मितेचा मुद्द्यावर शिवसेना मैदानात उतरायची. मात्र शिवसेनेचे ते स्पिरीट आता संपलंय, या शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टिका केली. सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेचे संघटनेवर लक्ष कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयावर दिलखुलास चर्चा केली.

राम मंदिराच्या भ्रष्टाचाराबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी अहवाल बोलावला. त्याची चौकशी सुरु आहे. मात्र तरीही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून सातत्याने टिका चालवली आहे. सामनाच्या माध्यमातून शिवसेना सातत्याने भाजपवर गरळ ओकत आहे, त्याचा एकत्रित निषेध म्हणून शिवसेना भवनावर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मारहाण करणाऱ्या सेना कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला, राज्याची धुरा असलेल्य़ा व्यक्तीने असल्या गोष्टीचे समर्थन करावे यातून चुकीचा संदेश जात असल्याची टिका प्रविण दरेकर यांनी केली. भाजप कार्यकर्त्यांना शिवभोजन मिळाले, या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, दरेकर यांनी सध्या सचिन वाझे आणि प्रदिप शर्मा हे दोन शिवसैनिक कोठडीत आहे, त्यांना शिवभोजन नाही तर भत्ता मिळतो अशी बोचरी टिका केली.

महाविकास आघाडीचे सरकार अमुक तारखेला किंवा तमुक तारखेला पडेल असा दावा जेष्ठ भाजप नेत्यांनी कधी केला नाही. मात्र मी आता सांगतो की हे सरकार कुठल्याही क्षणी पडेल. पण सरकार पाडण्याचे पाप आम्ही घेणार नाही. या सरकारमध्ये एवढा अंतर्विरोध आहे की त्या ओझ्यानेच सरकार पडणार आहे. असा दावाही दरेकर यांनी केला.

कोरोना काळात केंद्राने राज्यांना रेमडेसिवर, व्हेटिंलेटरपासून ते लसीपर्यंत सर्व दिले. यामध्ये महाराष्ट्राने काय केले, असा सवालही त्यांनी केला. मात्र तरीही मोदी यांच्या विरोधात देशभर वातावरण केले जात आहे.मात्र आपण एका भिषण अवस्थेतून गेलो, त्यामुळे राज्यासह, केंद्र सरकारही अनेक पातळ्यांवर हतबल ठरल्याची दरेकर यांनी कबूली दिली. मात्र तरीही मोदींची लोकप्रियतेवर फरक पडला नाही असा दावाही त्यांनी केला.

जी गोष्ट शक्य होणार नाही त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची काय गरज होती ? असा प्रश्न त्यांनी मुंबई महापालिकेने काढलेल्या लसीच्या ग्लोबल टेंडरबद्दल उपस्थित केला. टेंडर काढले तर माणसे का आली नाहीत. केवळ केंद्राला टार्गेट करण्यात साठी हे केले अशी टिका दरेकर यांनी केली. आज बऱ्याच खासगी रुग्णालयात बऱ्यापैकी लसीकरण होत आहे. अधिक पैसे जातील म्हणून राज्य सरकार लस आणत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. लसीकरणाच्या बाबतीत राज्य सरकारने कुठे कमी पडले, ते त्यांनीही मान्य करायला पाहीजे. शेवटी न्यायपालिकेने राज्यावरही ताशेरे ओढल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार चालढकल करत आहे. फडणवीस सरकारचा निर्णय हायकोर्टाने ग्राह्य धरला मात्र सुप्रीम कोर्टाने फेटाळला. त्यामुळे कोर्टात बाजू मांडण्यात ठाकरे सरकार कमी पडले हे स्पष्ट असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ओबीसी, आणि पद्दोन्नतील आरक्षणाबद्दल सरकार समाजाला खेळवत आहे.भुजबळ साहेबांना रस्त्यावर उतरण्याची गरज काय आहे. त्यांनी सरकारला सांगावे असा सल्लाही दरेकर यांनी दिला.

हे सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोबत घेत नसल्याची तक्रार दरेकर यांनी केली. आमच्या सरकारमध्ये साखरेच्या मुद्या चिघळला असतांना, दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना सोबत घेऊन केंद्राकडे गेलो होतो.मात्र यावेळी सरकारचे प्रतिनीधी पंतप्रधानांना भेटले. त्यांना आमच्याबद्दल तिरस्कार असल्याचे वाटत, असेही त्यांनी म्हटले. बारा आमदारपेक्षा राज्यात इतर खूप विषय आहेत. राज्यात आर्थिक समस्या, कोविड आदी असंख्य विषय आहेत. आमदारांच्या नियुक्तीपेक्षा ते अधिक महत्वाचे आहे. अस दरेकर यांनी सांगितले.

मध्यतंरी सोशल मिडीयावर आमच्या पक्षाचे दुर्लक्ष झाल्याचे दरेकर यांनी कबूल केले. कोरोना काऴात मोदी सरकारने प्रामाणिकपणे काम केले. सोशल माध्यमावर लाईक आणि डीस लाईक होत असते.मात्र आजही त्यांचा मन की बात हा कार्यक्रम लाखो लोक ऐकत आहेत. दरम्यान सोशल माध्यमांवर विरोधकांनी अधिक लक्ष घातले आहे,त्यामुळे हे चित्र दिसत असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत सामना भाजप आणि शिवसेनेत होणार आहे. शहरात राष्ट्रवादीचे अस्तिव नाही. कोरोना काळात भाजपने खूप काम केलेले आहे. आमचा सामाजिक कनेक्ट वाढला आहे. फडणवीस सरकारने मुंबईच्या पायाभूत सुविधेचे प्रकल्प सुरु केले.मात्र सध्याच्या सरकारमध्ये ते पुढे जातांना दिसत नाही. 25 वर्षे सत्तेत राहूनही शिवसेनेला हिंदमाता इथ साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे यावेळी शिवसेनेला अँटी इनकम्बसीचा फटका सोसावा लागणार आहे अस भाष्यही दरेकर यांनी केलं. मराठी मतदार हा आता कुण्या एका पक्षाचा राहीला नाही. त्यामुळे निवडणूकीत भाजपचा पगडा भारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निसर्ग वादळातील 50 टक्के लोकांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, अजूनही पंचनामे केले जात आहेत.सेनेला कोकणाने मोठे केले पण या सरकारने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली.विदर्भ, मराठवाड्याच्या बाबतीत हेच सुरु आहे. त्यामुळे विकासाचे संतुलन बिघडल्याचे दरेकर यांनी म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

GT vs CSK Live IPL 2024 : चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर तर गुजरात इलिमिनेशन टाळण्यासाठी जोर लावणार

मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न पुढे ढकलले, माथेफिरू तरुणाच्या कृत्याने गाव हादरले

SCROLL FOR NEXT