sudhir-mungantiwar.jpg
sudhir-mungantiwar.jpg 
मुंबई

मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल - सुधीर मुनगंटीवार 

दीनानाथ परब

"आतापर्यंत आरोप-प्रत्यारोप अनेक झाले. काही महिन्यांपासून राज्यात जे घडत आहे, त्यामुळे राज्याचे धिंडवडे निघत आहेत. राज्यघटनेचा याच राज्यात अनादर होत आहे" असा आरोप भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. "ज्या सरकारने आयुक्त मागून त्यांची निवड केली. परमबीर सिंह यांनी ३२ वर्ष सेवा केली, त्यांनी मंत्र्यांवर जे आरोप केलेत, त्याची चौकशी झाली पाहिजे" असे मुनगंटीवार म्हणाले. "पोलीस महासंचालक दर्जाचा माणूस गृहमंत्र्यांवर आरोप करतो. राज्यपाल हे महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख आहेत. या प्रकरणाचा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवणे गरजेचं आहे. आम्ही राज्यपालांना भेटून मागणी करणार आहोत" असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 


परमबीर सिंह यांनी फक्त पत्र नाही लिहिलं, तर अनेक स्पष्ट उल्लेख केले आहेत. या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर अहवाल मागणे आवश्यक आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. कधी मुंबई पोलिसांची स्कॉटलंड यार्ड सोबत तुलना केली जायची. आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल असे मुनगंटीवार म्हणाले. 

"राज्यपालांकडे या सगळ्या तक्रारी पाठवण्याची वेळ आली आहे. राज्यपालांकडे जाऊन मंत्री शपथ घेतो त्यानंतर ते आकस बुद्धीने वागत असतील तर घटनेच्या चौकटीत, सत्यावर, संविधानाच्या चौकटीवर आधारीत राज्यपालांनी राष्ट्रपतींना अहवाल पाठवावा." 

"१७ स्पटेंबरला १९८० राष्ट्रपती राजवट लागली त्याची कारण मी बघितली आज माझ्यासारख्या सामान्य आमदाराला त्या परिस्थितीशी साम्य दिसतय. राज्यपालांनी सत्याच्या आधारावर, घटनेच्या तरतुदीच्या आधारात सत्यकथन करणार आहावाल राष्ट्रपतींना पाठवावा" असे मुनगंटीवार म्हणाले. 

दारूच्या दुकांनांसाठी यांच्यात भांडण झाली होती. परवान्यात सूट दिली मग विजेच्या बिलात सवलत का नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. बेईमानीच्या जोरावर सत्तेची इमारत उभी आहे. आम्ही पूर्ण शक्तीने सरकारला घटनाबाह्य गोष्टीचा जाब विचारू. तुम्ही पाठ वाचवू शकणार नाही असे मुनगंटीवार म्हणाले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT