BJP leader Union Minister Anurag Thakur  sakal
मुंबई

Mumbai "राऊतांच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवत का" ? केंद्रीय मंत्र्यांचे मुंबईत वक्तव्य

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राऊत यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवते असे म्हणत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सोमवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे मतदार संघाच्या दौऱ्यावर आले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापन झाले होते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानतंर राज्यात गाजलेला पहाटेचा शपथविधीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहेत असे वक्तव्य केले आहे.

यावर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राऊत यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवते असे म्हणत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे मतदार संघाच्या दौऱ्यावर आले आहेत.

डोंबिवलीतील रोटरी भवन येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठक मंगळवारी संपन्न होत आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन संघटन मजबूत करणे, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन ठाकूर हे पदाधिकाऱ्यांना करत आहेत.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. जगात सात आश्चर्य आहेत, त्यातील दोन दिल्लीत बसले आहेत. तर महाराष्ट्रात दहावे आश्चर्य असून फडणवीस हे दहावे आश्चर्य आहेत असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

यावर मंत्री ठाकूर म्हणाले, त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा त्यांनी केलेल्या घोटाळ्यांवर चर्चा केली तर बरे होईल असे म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे.

या ठिकाणी भाजपाचा दुसरा दौरा होत असून येथे भाजपा दावा ठोकणार आहे का ? या ठिकाणी कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे ? याविषयी प्रश्न विचारले असता इथून कोण लढणार, इथला उमेदवार कोठे जाणार याची चिंता तूम्ही करु नका असा सल्ला दिला. तसेच एकत्रित लढू, जोरदार लढू आणि आधीपेक्षा जास्त विजय संपादन करु असे त्यांनी सांगितले.

आतंकवाद थांबवायचा असेल तर मुस्लिम तरुणांना सैन्यात भरती करा. अशी मागणी गुलाब रसूल यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशांमध्ये खेळाची टीम असो किंवा सैन्याची टीम असो कोणत्याही जाती धर्मावरून त्यांची निवड केली जात नाही तर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर, त्यांच्या गुणांवर त्यांची निवड केली जाते असे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT