Juhu-Beach 
मुंबई

वीकेंडला जुहू बीच बंद ठेवा; भाजप आमदाराची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत सध्या कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगताना दिसत आहे. त्यामुळे विकेंडला जुहू बीचवरील पर्यटकांचा वावर बंद ठेवावा, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे. मुंबईतील रहिवासी आणि मुंबई पाहायला येणारे पर्यटक हे शनिवारी आणि रविवारी जुहू बीचवर मोठ्या संख्येने फिरायला येतात. पण कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सध्या विकेंडला जुहू बीच बंद ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजप आमदार अमित साटम यांनी मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र पाठवत मागणी केली आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता जुहू बीच शुक्रवारी रात्र ते रविवार रात्र या कालावधीत बंद ठेवावा, अशी मागणी साटम यांनी केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात एकूण १,५०० जण करोनाबाधित असल्याची माहिती आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या निरिक्षणाच्या आधारे सार्वजनिक पर्यटन स्थळी विकेंडच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसते.

"सोशल डिस्टन्सिंगचा नियम सार्वजनिक पर्यटन स्थळी पाळले जात नाहीत. धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने पाहुणे किंवा कार्यकर्ते बोलावण्यास मनाई आहेत. पण सार्वजनिक पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी यापेक्षाही जास्त गर्दी होताना दिसते. त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहणार आहोत. वरिष्ठांकडून आम्हाला जुहू बीचची प्रवेशद्वारे बंद ठेवण्याचे आदेश मिळाले की आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू", अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाची घोषणा

SCROLL FOR NEXT